नमस्कार मित्रांनो दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
मित्रांनो गावाखेड्यामध्ये वसुबारस या सणाला फार महत्त्व आहे या सणाला गाई वासरांची दिवाळी असं म्हटलं जातं. शेतकरी वर्ग या सणाला अगदी मोठ्या उत्साहामध्ये साजरा करतो वसुबारस हा सण अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या बाराव्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी गाई आणि वासरांची पूजा केली जाते त्यांचा सन्मान केला जातो. यामध्ये वस्तू म्हणजे काय आणि पारस म्हणजेच बारावा दिवस आणि म्हणूनच याला वसुबारस असं नाव पडलेल आहे.
वसुबारस हा सण संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या नावांनी आनंदात उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी वसुबारस नऊ नोव्हेंबरला येत आहे. तर आपण न चुकता गाई आणि वासरांची पूजा करून या सणाचा आनंद साजरा करावा.
वसुबारस या सणाचे महत्त्व तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल. मी स्वामी चरणी प्रार्थना करतो की तुमची ही दिवाळी आनंदाची आणि भरभराटीची जावो.

Comments
Post a Comment
श्री स्वामी समर्थ.. तुमचा आजचा दिवस चांगला जावो