Ganesh Visarjan Muhurth
नमस्कार स्वागत आहे तुमच. आपल्याकडे पूर्ण देशभरामध्ये गणेशोत्सव साजरा केला जातो गणेश उत्सव हा दहा दिवस चालतो आणि अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जनाने या उत्सवाची सांगत होते यावर्षी गणेश विसर्जन 28 सप्टेंबर रोजी होणार आहे तर मग तर मग जाणून घेऊयात विसर्जनाची शुभ वेळ आणि केल्या जाणाऱ्या पूजेची पद्धत.
गणपती विसर्जन मुहूर्त -
यावर्षी 28 सप्टेंबरला म्हणजेच गुरुवारी गणपती विसर्जन केलं जाणार आहे. आपल्याकडे काही लोक दीड दिवसाचा गणपती तीन दिवसाचा गणपती पाच किंवा सात दिवसाचा गणपती बसवतात. परंतु जास्त करून आपल्याकडे दहा दिवसाचा गणपती बसवला जातो आणि अनंत चतुर्दशीचा मुहूर्त विसर्जनासाठी साधला जातो.
गणेश पूजन महत्त्व -
भारतामध्ये गणेश उत्सवाला एक विशेष महत्त्व आहे. आणि हिंदू धर्मामध्ये गणपतीच्या पूजेला देखील फार महत्त्व देण्यात येतं. अशी मान्यता आहे की दहा दिवस गणेशाची आराधना केल्याने भाविकांची सर्व दुःख दूर होतात. अनंत चतुर्दशीला आपण गणपती विसर्जन करतो आणि असं मानलं जातं की या दिवशी बाप्पा आपल्या घरी परत जातात आणि त्यांना आनंदाने निरोप दिला जातो आणि पुढच्या वर्षी पुन्हा परत या असा आग्रह धरला जातो.
यावर्षी गणेश विसर्जनाचा मुहूर्त हा सकाळी 6.10 ते 7.40 पर्यंत असेल. व संध्याकाळी गणेश विसर्जनाचा मुहूर्त हा 4.41 ते 9.10 वाजेपर्यंत शुभमुहूर्तावरती आपण गणपती विसर्जन करू शकतो.
यावर्षी गणेश विसर्जन करण्यापूर्वी विधीप्रमाणे गणेशाची पूजा करावी पूजेतरम्यान गणपतीला लाल फुलं दुर्वा मोदक सुपारी धूप दीप इत्यादी अर्पण करावे. पूर्ण कुटुंबाने गणपतीची दहा दिवस सेवा केल्यानंतर गणपतीला निरोप देताना सर्वांचेच डोळे भरून येतात. त्यामुळे गणपतीला पुढच्या वर्षी पुन्हा येण्याचा आग्रह धरावा. धन्यवाद

Comments
Post a Comment
श्री स्वामी समर्थ.. तुमचा आजचा दिवस चांगला जावो