पहा या आठवड्यात कोणाच्या राशीत काय लिहिलंय ते | राशिभविष्य | Rashibhavishya

rashi bhavishya

 

नमस्कार , Rashibhavishya येणारा आठवडा तुमच्यासाठी कसा असणार आहे हे तुमच्या राशीवरून तुम्ही जाणून घेऊ शकता तर मग चला जाणून घेऊयात कोणत्या राशीच्या नशिबात काय लिहिले या आठवड्यात..

सिंह -

या राशीतील लोकांनी या आठवड्यामध्ये आपल्या आरोग्यविषयक समस्यांकडे लक्ष द्यायला हवं अन्यथा त्रास होऊ शकतो. शासकीय प्रशासकीय लोकांशी तुमच्या गाठीभेटी वाढतील भागीदारी होण्याची संभावना आहे. हा आठवडा तुमच्यासाठी आर्थिक दृष्ट्या अनुकूल नाही त्यामुळे खर्च शक्य तेवढा कमी करण्याचा प्रयत्न करा. परंतु नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा आठवडा चांगला राहील व्यापारामध्ये किरकोळ चढउतार आले तरी व्यापार उत्तम राहील आणि वैवाहिक जीवनातील ताण तणाव हे कमी होतील. 

मेष

हा आठवडा या राशीसाठी चांगला आहे परंतु आठवड्याच्या सुरुवातीला विनाकारणच तुमच्या खर्चात वाढ होईल आणि तुम्ही थोडे त्रस्त व्हाल तुमची इच्छा नसतानाही तुम्हाला विनाकारण खर्च करावा लागेल आणि तुमच्या खिशावर ताण येईल. येत्या आठवड्यामध्ये या राशीतील लोकांची तब्येत बिघडण्याची शक्यता अधिक असल्याने प्रकृतीकडे लक्ष द्यावे. आठवडा व्यापारासाठी चांगला आहे तुम्हाला अपेक्षेपेक्षाही जास्त फायदा या आठवड्यामध्ये मिळू शकतो. शेअर बाजारामध्ये काम करत असलेल्या लोकांसाठी हा आठवडा अत्यंत चांगला आहे या राशीतील लोकांना या आठवड्यामध्ये भरघोस फायदा होईल. 

कर्क - 

येता आठवडा तुमच्यासाठी मिश्र स्वरूपाचा असणार आहे. येत्या आठवड्यात तुमची प्रकृती ही ठणठणीत राहील परंतु तुमच्या खिशावर ती मात्र थोडासा ताण येईल. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदाराशी संबंध हे ठीक राहतील आणि प्रणय जीवनासाठी हा आठवडा अत्यंत अनुकूल आहे. या आठवड्यात तुमचे विरोधक डोके वर काढतील. 

मिथुन - 

येणारा आठवडा हा आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. या आठवड्यामध्ये तुम्ही काहीतरी नवीन काम करून प्रसिद्धी मिळवू शकता त्यामुळे तुमची पगार वाढ होण्याची शक्यता आहे. येणाऱ्या आठवड्यामध्ये वैवाहिक जीवन हे फारसं चांगलं राहणार नाही परंतु फार भांडण होतील असे बिलकुल नाही. व्यापारामध्ये येणाऱ्या आठवड्यामध्ये मित्रांचे चांगले सहकार्य मिळेल. आणि प्रणय जीवनासाठी हा आठवडा ठीकठाक असणार आहे.

कन्या -

येत्या आठवड्यामध्ये एखादा दीर्घ पल्ल्याचा प्रवास तुम्ही करू शकता. कदाचित तुमच्या आई-वडिलांची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे त्यामुळे त्यांची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. काही लोकांशी तुमचा वाद होऊ शकतो या व्यक्ती तुमच्या वरिष्ठांच्या जवळच्या असतील तेव्हा जरा सावध राहा. परंतु तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये पूर्णपणे सकारात्मकता आहे आणि तुमचे प्रणय जीवन या आठवड्यामध्ये अत्यंत चांगलं राहील. घरामध्ये सकारात्मक वातावरण राहील. 

तूळ - 

या आठवड्यामध्ये तुम्हाला थोडी ध्यानधारणा करावी लागेल ज्यामुळे तुमचा मानसिक ताण कमी होऊ शकेल. नोकरी आणि व्यवसायाच्या ठिकाणी परिस्थिती थोडीशी तणावपूर्ण राहील. आवश्यकता असल्यास आपल्या जवळच्या व्यक्तीजवळ आपलं मन मोकळं करावं. वैवाहिक जीवनात ताण त्यांना वाढवून देण्याची खबरदारी घ्या अन्यथा त्रास होऊ शकतो.

वृश्चिक -

हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे आणि तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी मनासारखे परिणाम पाहायला मिळतील. तुम्हाला अनपेक्षित लाभ होईल. आपण आपल्या प्रेमी केला विवाहाची मागणी घालू शकता कारण प्रेमीजनांसाठी हा आठवडा अत्यंत अनुकूल आहे. या आठवड्यात आपला ताप किंवा पित्त प्रकोप वाढू शकतो त्यामुळे आपल्या प्रकृतीची थोडीशी काळजी घ्या. खर्चामध्ये वाढ होईल परंतु तो वायफळ खर्च नसेल.

कुंभ - 

येणाऱ्या आठवड्यात तुमची काम ही प्रगतीपथावरती असतील. तुम्हाला तुमच्या कुटुंबीयांचं आणि बायकोचं समर्थन मिळेल प्रत्येक गोष्टीत. व्यापारामध्ये चांगला फायदा होईल चांगलं अर्थार्जण तुम्ही करू शकाल. प्रणय जीवनाचा चांगलाच आनंद तुम्ही उपभो शकाल आणि प्रेमिकेच्या सहवासात तुम्हाला बराच वेळ घालवण्याची या आठवड्यात संधी मिळेल.

तर मग मित्रांनो अशा पद्धतीने या राशींसाठी हा आठवडा राहणार आहे तर तुमची कोणती रास आहे त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या आठवड्याचा सारासार विचार करून निर्णय घेऊ शकता. जेणेकरून तुम्हाला कमीत कमी त्रास होईल आणि जास्तीत जास्त फायदा होईल. ही माहिती तुमच्या जवळच्या मित्रमंडळींसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद..

Comments