नमस्कार Swami Samarth भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा. स्वामी भक्तांनो या पृथ्वीतलावर जन्म मृत्यू चा फेरा हा चालूच राहतो. जन्म आहे म्हणून मृत्यू आहे व मृत्यू आहे म्हणून जन्म आहे. या जगात माणसाला त्याच्या कर्मानुसार पुढील जन्म कशाचा मिळेल हे ठरते. तर आज आपण जाणून घेणार आहोत मांजराचा जन्म कसा मिळतो ते..
आल्या जन्मात माणसाने केलेल्या पाप - पुण्यानुसार त्याला स्वर्गात किंवा नरकात जागा ही मिळत असते. नरकात केलेल्या पापांचे मोजमाप केले जाते व जास्त पाप केले असल्यास त्याला भटक्या पशू पक्षांचा जन्म घ्या लागतो.
तर आज आपण मांजराचा जन्म कोणत्या पापाच्या अनुसार मिळतो हे पाहतोय. त्यासाठी एक कथा मी सांगतो म्हणजे तुम्हाला समजेल. श्री स्वामी समर्थांच्या दरबाराबाहेर एक मांजर येऊन रडत असते.. तेव्हा काही स्वामी भक्त त्या मांजराला हकलवून लावतात. ते मांजर पुन्हा दुसऱ्या दिवशी येऊन रडू लागते ही बातमी स्वामींना समजते. तेव्हा स्वामी म्हणतात की अरे त्या मांजराला माझ्याकडे घेऊन या. तेव्हा लोक त्या मांजराला स्वामींकडे घेऊन जातात. स्वामी पाहतात तर त्या मांजराचा पाय मोडलेला असतो. स्वामी विचारतात की अरे तुझा पाय कसा मोडला ? तेव्हा मांजर म्हणाले की मी काहीही केलेलं नसताना या गावातली एका सन्याशाने मला दगड फेकून मारला व माझा पाय मोडला... आता तुम्हीच न्याय करा महाराज... तेंव्हा महाराज यांनी त्या सन्याशाला बोलावून घेतले. व विचारले की तू या मांजराचा पाय का मोडला.. तेंव्हा तो म्हणला की महाराज मी भिक्षा ग्रहण करणार होतो तेव्हड्यात या मांजराने माझ्या भिक्षेला स्पर्श केला.. त्यामुळे मी या मांजराला दगड मारला व त्यामध्ये याचा पाय मोडला.
तेव्हा स्वामी म्हणाले, अरे तो मुका प्राणी आहे, त्याला समजत नाही पण तुला कळत नाही का..? तू याला नाहक त्रास दिलेला आहेस त्यामुळे तू शिक्षेस पात्र आहेस. पण तुला मी नाही तर हे मांजरच शिक्षा देईल. तेंव्हा स्वामी मंजरला म्हणाले की दे याला शिक्षा... तेव्हा मांजर म्हणाले की याला गावच्या बाहेरच्या शिव मंदिराचा महंत करा.. मग स्वामींनी त्याला महंत केले.. तेव्हा महांताला वाटले की मांजर बावळटच आहे.. अशी कुणी शिक्षा देत का.. ही तर उलट माझ्यासाठी चांगली पैसे कमावण्याची संधी आहे.. तेव्हा स्वामी हसले व मांजराला म्हणाले की वा शाब्बास... तेंव्हा तिथे उपस्थित काही लोकांनी त्या मांजराला विचारले की तू त्याला अशी काय शिक्षा दिलीस ? .. तेव्हा त्या मांजराने सांगितले की शिव्याशाप देणारे, इतरांचे धन लुबाडणारे पुढच्या जन्मी मांजराचा जन्म घेतात. मी त्यामुळेच मांजर झालो आहे.. आणि मी ज्या शिव मंदिराचा महंत होतो मी त्याला त्याच मंदिराचा महंत केला आहे..मी मागच्या जन्मी माझ्या महंत पदाचा खूप दुरुपयोग केला आहे.. आता भोग कर्माची फळे .. असे म्हणून ते मांजर तिथून निघून जाते...
अशा पद्धतीने माणसाने आयुष्यात नेहमी चांगली कर्म करावीत. त्यामुळे पुढचा जन्म चांगला मिळतो..... स्वामी भक्तहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा.. व स्वामींची सेवा करत राहायला विसरू नका... धन्यवाद.. श्री स्वामी समर्थ..

Comments
Post a Comment
श्री स्वामी समर्थ.. तुमचा आजचा दिवस चांगला जावो